नागरिकांचा जीव धोक्यात!
कल्याण \शंकर जाधव: कल्याण–वडवली रिंग रोडवर कार आणि मोटारसायकल स्टंटबाजी आणि भरधाव रेसिंगमुळे नागरिकांचा जीव सतत धोक्यात आहे. अलीकडेच, दुकाने बंद करून घरी जात असलेल्या ५० वर्षीय व्यावसायिकाला रेसिंग करत असलेल्या अज्ञात भरधाव कारने जोरदार धडक दिली.
यामुळे व्यावसायिकाचे डोके गंभीररीत्या दुखापत झाले असून, तो सध्या आयसीयूमध्ये उपचाराधीन आहे. जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
रिंग रोडवरील नवा कोरा व गुळगुळीत रस्ता कार रेसिंग आणि स्टंटबाजीसाठी आदर्श ठरल्यामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. पोलिसांची नियमित गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाय न घेण्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
