कर थकबाकी प्रकरणी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई !



महापालिकेच्या ३/क प्रभागात ५,८२,०४२/- रक्कम थकीत 

कल्याण : कल्याण (पश्चिम) ३/क प्रभाग क्षेत्रातील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देवूनसुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, परिमंडळ-१ चे उपआयुक्त प्रसाद बोरकर यांचे समवेत ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात व अधीक्षक बजरंग बजागे यांच्या पथकाने रक्कम रु. ५,८२,०४२/- इतक्या पोटी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई करण्यात आली.


यामध्ये कल्याण (पश्चिम) रामबाग येथील मालमत्ता क्र.C0100616300 रक्कम रु. ५,८२,०४२/-इतक्या थकबाकीपोटी पवन बार सील करण्यात आला. त्याचप्रमाणे कल्याण (पश्चिम) येथील राजा हॉटेल मालमत्ता क्र.C01000077700 यांची थकबाकीची रक्कम रु. ४,३६,५७८/- चेकद्वारे वसूल करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post