तंत्रज्ञान वापरत कायम शिकत राहू



 शितल अरोरा यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र


अंबरनाथ \ अशोक नाईक  : दि एज्युकेशन सोसायटी संचालित अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालयात शापुरजी पालनजी पंडोळ टाकोळी हायवे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सौजन्याने चार डिजिटल इंटर ॲक्टिव्ह बोर्ड बसवण्यात आले. या डिजिटल बोर्डच्या उद्घाटन प्रसंगी कंपनीच्या सी. एस. आर. प्रमुख शितल अरोरा यांनी तंत्रज्ञान हे प्रगतीला पूरक असावं, शिक्षणासाठी त्याचा जरूर चांगला उपयोग करावा,या बोर्डचा वापर करुन शिक्षणाचा आनंद घ्या असेही त्यांनी सांगितले.



डिजिटल युगात वावरत असताना आपण मागे राहून चालणार नाही. हे लक्षात आल्याने शाळेत डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्याचे ठरले.यासाठी १९७५ सालच्या जुनी अकरावीच्या शेवटच्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि कंपनीचे उप व्यवस्थापकीय संचालक सुनील कुलकर्णी यांच्यामार्फत शापुरजी पालनजी कंपनीने चार डिजिटल बोर्ड व स्पायडरनेट मुलांसाठी शाळेला दिले. यावेळी माजी विद्यार्थी वंदना वैद्य, उमेश तायडे,दिलीप दलाल,गिरीश त्रिवेदी, राजन कर्णिक, प्रा. भगवान चक्रदेव, दिलीप साठे, गोपाळ दामले, पंकज भालेराव, दिलीप कणसे, माधुरी जाधव तसेच विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. यावेळी बोर्ड हाताळणी प्रात्यक्षिक अतुला भावे यांनी करून दाखवले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा शेळके, प्रास्ताविक अध्यक्ष डॉ. अजित गोडबोले यांनी केले तर आभार मुख्याध्यापक संतोष भणगे यांनी  मानले.




Post a Comment

Previous Post Next Post