चला, पाणी वाचवूया – भविष्य सुरक्षित करूया'

 



जागतिक जल दिनानिमित्त डोंबिवलीतील विद्यार्थ्यांकडून 'जलसुरक्षा' दिंडी


डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (पर्यावरण विभाग) यांच्या सहकार्याने मिलापनगर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन, सुदर्शननगर निवासी संघ- एमआयडीसी डोंबिवली, शिवाई बालक मंदीर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय ( ज्ञानमंदीर शाळा ), एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुप, पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाउंडेशन, श्री लक्ष्मीनारायण संस्था आणि विवेकानंद सेवा मंडळ (स्वच्छ डोंबिवली अभियान) यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च  जागतिक जल दिनाचे औचित्य साधून 'पाण्याचे महत्त्व आणि  पाणी वापर' याविषयी जनजागृतीसाठी शुक्रवार 21 तारखेला सकाळी साडे सात वाजता   डोंबिवलीत  जल 'सुरक्षा' दिंडी काढण्यात आली.यावेळी 'चला, पाणी वाचवूया – भविष्य सुरक्षित करूया' अशी घोषणा देण्यात आली.




   शिवाई बालक मंदिर शाळा - निवासी बस स्टॉप - लक्झुरिया बिल्डिंग रस्ता - श्री गणेश मंदिर - शिवप्रतिमा हॉल - शिवाई बालक मंदिर शाळा, के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय - कावेरी चौक - सुदर्शन नगर उद्यान - साईबाबा मंदिर, आजदे - औदुंम्बर कट्टा- सिस्टर निवेदिता शाळा- चतुरंग बिल्डिंग - मिलापनगर बस स्टॉप - ओंकार शाळा रस्ता - के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय या मार्गांवर विद्यार्थ्यांनी जलदिंडी काढली. या जलसुरक्षा दिंडी मध्ये शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जलदिंडी शिवाई बालक मंदिर शाळा व के. रा. कोतकर माध्यमिक विद्यालय मधील विद्यार्थी सहभागी घेतला.पाणी वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, तेंव्हा आपल्या परिसरात होणाऱ्या या जनजागृती जलदिंडीमध्ये सहभागी व्हा आणि पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले होते.या जलदिंडी आयोजनासाठी सुरेखा जोशी, वर्षा महाडिक, हर्षल सरोदे इत्यादीनी अथक मेहनत घेतली.





Post a Comment

Previous Post Next Post