दिव्यातील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई

 



दिवा / आरती परब : बुधवारी दुपारी रिलायन्स टॉवरच्या मागे दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई ठाणे महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ १ व दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांनी दिवा शहरात प्रभाग २८ मध्ये अनधिकृत बांधकामावर केली आहे.


दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने बुधवारी  दिवा प्रभाग समितितील प्रभाग २८ मधील नव्याने सुरु असलेल्या दोन अनधिकृत इमारतीचे प्लिंथ तोडण्यात आली. ठाणे महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ १ मनीष जोशी यांच्या आदेशान्वये व दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र गिरी व बिट निरीक्षक सुहास रोकडे यांचे उपस्थितीत यंत्रसामुग्री व जेसीबीच्या सहायाने पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post