पोलीस आयुक्तांची जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घेतली भेट
दिवा / आरती परब : कल्याण - डोंबिवली येथील ६५ बेकायदा इमारती व दिवा विभागातील ५४ इमारती संदर्भातील दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे, यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा येथील शिष्टमंडल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर प्रकरणात काही भूमाफीया विकासक व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार घडल्याचा संशय आहे. त्यामुळे निष्पाप नागरिक अनधिकृत इमारतीमध्ये राहण्यास बाध्य झाले आहेत. तर दुसरीकडे दोषी व्यक्ती अजूनही मोकाट फिरत आहेत. बनावट सातबारा, खोटे मोजणी नकाशे व बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत. भूमाफिया विकासक आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करुन फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावे. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसावा यासाठी महसूल व महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधून ठोस उपाययोजना कराव्यात, असे आशयाचे पत्र जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिले आहे. सदर प्रकरणाचे योग्य ती चौकशी करून आपण कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन देताना जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख प्रमुख राहुल भगत, उपजिल्हा प्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, विजय कदम, लहू चालके, दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, रवींद्र सुर्वे, कळवा शहर संघटिका कल्पना कवळे, मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडीयाली, उपशहर प्रमुख अनिश कुरेशी आदी उपस्थित होते.
.jpeg)
