कोल्हापूर \ शेखर धोंगडे : बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव दि. २६ ते २८ दि. २९ मार्च रोजी आमावस्या या कालावधीत मुदाळ तिट्टा ते निढोरी या रोडवर भाविक रोडवरुन चालत येत असतात, तसेच पुलाच्या खाली सर्वत्र भाविक असतात त्यामुळे रोडवर प्रचंड प्रमाणात गर्दी होवुन वाहतूककोंडी होते. वाहतूक सुरू ठेवल्यास अपघात होऊ शकतात. या करीता वाहतुक वळविणे गरजेचे आहे. यात्रा काळात कोणतीही बाधा येवू नये व यात्रा शांततेत साजरी व्हावी, यासाठी या परिसरात पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी दि.२६ रोजी सकाळी ७ वा. ते दि. २९ मार्च रोजी रात्री १२ वा. रहदारी नियमन आदेश जारी केले आहेत.
श्री बाळूमामा भंडारा यात्रा ही मोठ्या उत्साहात साजरी होते. या करीता एक ते दीड लाख भाविक स्थिर असतात तसेच येणारे जाणारे भाविक एक ते दीड लाख दरवर्षी असतात. टीव्ही सीरीयलमुळे अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. बाळूमामा मंदिर हे फोंडा ते निपाणी जाणारा राज्य महामार्गावर आदमापूर येथे रोडला लागून आहे. तसेच गारगोटी ते कोल्हापुर राज्यमार्ग हा १ कि. मी. अंतरावर आहे. दोन्ही राज्य मार्गावरती नेहमी अवजड वाहतूक व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.
बंद करण्यात व वळविण्यात आलेले मार्ग
मुरगूड कुडून कोल्हापूर, मुदाळ तिट्टा, गारगोटी तसेच राधानगरीकडे जाणारी वाहतुक ही निढोरी मार्गे-सोनाळी रोड-बिद्री-मुदाळ तिट्टा मार्गे गारगोटी, राधानगरी, कोल्हापूरकडे सोयीनुसार मार्गस्थ होईल. मुदाळ तिट्टाकडून मुरगूड निपाणीकडे जाणारी वाहतूक कुर, व्हणगुत्ती, वाघापूर फाटा- निढोरी या मार्गे मुरगुड-निपाणी कडे सोयीनुसार मार्गस्थ होईल.
नो पार्किंग झोन- मुधाळ तिट्टा ते निढोरी हा परिसर सर्व वाहनांकरीता नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. तसेच आदमापूर येथील उड्डाण पुलाखालील रोडवर सर्व वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.
पार्किंग सुविधा - भीष्मा पार्कींग उत्तर बाजु, आदमापूर, भीष्मा पार्किंग दक्षिण बाजू, आदमापुर, आर. के. इंजिनियरींग पार्किंग, आदमापूर, पाटणे मील पार्कीग, आदमापुर, मुदाळ व गणपतराव फराकटे पार्किंग, मुदाळ या ठिकाणी भाविकांना पार्किंग करता येणार आहे.
वरील निर्देश हे दिनांक २६ ते २९ मार्च रोजी या कालावधीत दिवस-रात्र सर्व मोटर वाहनांकरीता श्री बाळुमामा भंडारा यात्रा उत्सव संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुक बंद करणे व वळवण्यात येत आहे. या शिवाय इतर रस्ते, चौक या ठिकाणी वाहतूक आवश्यकतेनुसार सुरु बंद करणे अगर वळविण्यात येत आहे. हे निर्देश सर्व शासकीय, आपत्कालीन वाहने यांना लागू असणार नाही.
0000