दिवा \ आरती परब : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिव आरोग्य सेना (ठाणे जिल्हा) व हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शाखा चंदनवाडी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने, शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांच्या आदेशन्वये, मा. खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या मार्गदर्शनाने त्याचप्रमाणे शिवसेना संपर्क प्रमुख नरेश मणेरा (ओवळा-माजिवाडा), तसेच कामगार नेते राजन राजे, शिवसेना शहरप्रमुख प्रदिप शिंदे यांच्या उपस्थीतीत त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेनेचे सरचिटणीस जितेंद्र दगडु सकपाळ व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे यांच्या हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर आणि श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम नागरिकांच्या उत्सुर्फत प्रतिसादाने भव्य स्वरूपात शिवसेना शाखा, चंदनवाडी,ठाणे येथे पार पडला. यावेळी ५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
ठाणे जिल्हात गेल्या काही दिवसांपासुन रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवठा भासु लागल्याने येत्या काही दिवसात मुबलक रक्त साठा न झाल्यास रुग्णाच्या जिवीतास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रक्तदान हेच श्रेष्ठदान लक्षात घेऊन रक्तदान शिबीराचे आयोजन शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर आणि ठाणे जिल्हा समन्वयक एकनाथ अहिरे यांच्या मार्फत राबवण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास शिव आरोग्य सेनेच्या अक्षता पांचाळ, डॉ. रेखा भुईंबर, सानिया शेख, नाझ पाशा, अर्चना शाहिर, सचिन त्रिवेदी, राजेंद्र शिंदे, देवशी राठोड, अजित माने, उल्हास शिवणेकर, अजय राणे, संजय निकम, राजेंद्र शिरसैकर, महादेव होवाले, शंकर राणे, सखाराम मोरे, सुरेश भोसले तसेच हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे अजित चव्हाण, रमेश वर्तक, अनिल ढोपे, डॉ. राकेश यादव त्याच प्रमाणे शिवसेनेचे वागळे विभाग समन्वयक प्रदिप वाघ, आरोग्यदुत हेमंत पाष्टे, राजेश मोरे, जग्गनाथ तावडे, विभाग प्रमुख जिवाजी कदम, मया पाटील, गिरीश राजे, अकबर शेख, श्रीमती देशपांडे उपविभागप्रमुख विकास काळे, हरिश्चंद्र काळे, सुभाष वालगुडे, रुपेश जाधव, दत्ता सावंत, धोंडु मोरे, विकास चोमल, सदानंद गोर्वधने, शाखाप्रमुख तानाजी कदम, विष्णु (बाळा) मांडकुलकर, जयवंत म्हात्रे, विशाल मेड, राजेश खानविलकर, रमेश शिर्के, ज्ञानेश्वर बागवे, भास्कर शिर्के, सारंग कदम, अमीत जोशी, विनोद कदम, विशाल थोरात, सुविधा चकाले, उपशाखाप्रमुख भारत शेळके, अजित धनवडे, सुरेश मोरे, संतोष निकम, युवासैनिक सुशांत भुईंबर, अभिषेक कुमावत, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल भुईंबर, रघुनाथ महाडिक, तुळशीराम पाटील, तुकाराम चव्हाण, वसंत वाघमारे, शिवसैनिक निलेश पाष्टे, अजित मोरे, निलेश मोरे, विनायक राऊत, विराज काणेकर, राजू मालुसरे, लितेश केरकर, कुंदन पार्टे, समाजसेवक विजय गायकवाड, संदीप पवार, मनीषा गायकवाड, तानाजी पाटील, विवेकानंद मोहिते विशेष उपस्थीती गणेश कुंभार, संजय देवकर, ॲडव्होकेट सुशील शिलवंत, राज बर्वे, हितेश बर्वे, स्टीफन कार्डोझा (मीरा- भाईंदर शहर संघटक युवा सेना), ऋषिकेश उभे (मीरा- भाईंदर शहर सचिव युवा सेना) जय जोशी (युवा सेना मीरा -भाईंदर पदाधिकारी) त्याचप्रमाणे शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हातील सर्व पदाधिकारी, हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट, शिवसेना शाखा चंदनवाडी शाखेचे तसेच शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.