दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करावे


भाजपचे विजय भोईर यांची ठाणे पोलीस आयुक्तांकडे मागणी

दिवा \ आरती परब : दिवा शहारातील वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारीत ही वाढ होत आहे. यासाठी दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्याची मागणी भाजपचे ठाणे जिल्हा शहर चिटणीस विजय भोईर यांनी पोलिस आयुक्तांकडे केली.

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची विजय भोईर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिव्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल तसेच ६ लाखांच्या वर झालेल्या लोकसंख्येला सध्याचे पोलिस बळ कसे अपुरे पडत आहे हे निदर्शनास आणून दिले. दिव्यात असणाऱ्या पोलीस चौकीतील पोलिसांवर कामचा ताण वाढतो असून भविष्यात येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करुन त्यात पोलिसांची संख्या ही वाढवली पाहिजे, असे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात भोईर यांनी मांडले आहे. तसेच त्या निवेदनावर पोलीस आयुक्त डुंबरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने मागणी पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालतो, असा शब्द भोईर यांना दिला. तर त्याचवेळी आयुक्तांनी पोलीस यंत्रणेला त्या अनुषंगाने ताबडतोब फोन करून सूचना दिल्या असल्याची माहिती भोईर यांनी दिली.

ठाणे पोलीस आयुक्त डुंबरे यांनी दिव्यातील गुन्हेगारी, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी आणि दिवा वासीयांच्या सुरक्षेबाबत दखल घेतली जाईल, असे डुंबरे यांनी त्यावेळी 
स्पष्ट केले. भाजपचे माजी गटनेते व नगरसेवक मनोहर डुंबरे यांनीही वैयक्तिकरित्या या प्रश्नी लक्ष घालण्यास विनंती केली आहे. प्रसंगी मनोहर डुंबरे, विजय भोईर, सुरेश चौधरी, अजित सानप आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post