मुंबई: सोमवारी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल २२२७ अंकांनी घसरून ७३,१३७ वर बंद झाला, तर निफ्टी ७४३ अंकांच्या घसरणीसह २२,१६१ या पातळीवर पोहोचला. या घसरणीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १९ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य काही तासांतच उडून गेले.
अमेरिकेने काही देशांवर नव्याने टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात घसरण झाली.
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाल्याने आयात महाग होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम आर्थिक धोरणांवर आणि गुंतवणुकीवर झाला आहे. टाटा स्टील, JSW स्टील यांसारख्या कंपन्यांचे समभाग ८ ते १० टक्क्यांनी घसरले. ऑटो सेक्टरमध्येही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे समभागही घसरले. ICICI, SBI आणि HDFC बँक यांच्यावर याचा परिणाम दिसून आला.
.jpeg)