दैनंदिन कामकाज मराठी भाषेतून करा

 


मनसेचे डोंबिवलीतील बँकांना पत्र 

डोंबिवली \ शंकर जाधव : गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार डोंबिवलीतील सर्व बँकांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे.

 डोंबिवली शहरातील प्रमुख बँकांना दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला प्राधान्यक्रम द्यावे असे पत्रात नमूद केले आहे. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल कामत, उपशहरअध्यक्ष श्रीकांत वारंगे, राजू पाटील, किशोर कोशिमकर, दीपक शिंदे, सचिव उदय वेळासकर, विभाग अध्यक्ष रतिकेश गवळी तसेच समीर भोर, धनराज तांबूसकर, राकेश अर्कशी, देवेश बटवाल, साहिल तिवारी आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post