माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते शानदार उदघाटन
अंबरनाथ/प्रतिनिधी : 'खारघर' हे वाशी आणि नेरूळ नंतर नवी मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाचे नियोजित विकसित उपनगर आहे. त्याच धर्तीवर चौथ्या मुंबईच्या दिशेने अंबरनाथमधील नवीन विस्तारित क्षेत्रातील नियोजित 'पालेगाव सिटी' हे एक मॉडेल आहे. इंडस्ट्रियल आणि नागरी वसाहतीमध्ये विश्वासार्ह बँकेची गरज होती. आज अंबरनाथमध्ये आयसीआयसीआय बँकेची विस्तारित शाखा पालेगाव येथे सुरू झाली. मी अपेक्षा करतो,की, या विभागात आयसीआयसीआय बँक एक नंबरवर राहील. असा विश्वास अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे गुलाबराव करंजुले पाटील यांनी बँकेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
अंबरनाथ (पूर्व) पालेगाव, राज निर्माण, आनंद ग्रीनलँड समोर, विश्वजीत पॅराडाईज जवळ आयसीआयसीआय बँकेच्या तिसऱ्या विस्तारीत शाखेचे शनिवारी शानदार उदघाटन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरसूमल बोलबंडा, युवासेनेचे निशात पाटील, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आयसीआयसीआय बँकेने गेल्या काही वर्षात देशात आर्थिक पायाभूत सुविधा स्थापन करण्यासाठी अनेक भारतीय संस्थांच्या स्थापनेत योगदान दिले आहे. आयसीआयसीआय बँक ही भारतातील एक आघाडीवरील खाजगी क्षेत्रातील बँक आहे.ती इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (आयसीआयसीआय) साठी ओळखली जाते. भारतातील सर्वात मोठ्या बँकांमधील एक बँक आहे. अशा यशोथरावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेची तिसरी शाखा अंबरनाथमधील पालेगाव येथे सुरू करण्यात आली आहे. याच बँकेचे पालेगाव डी मार्ट जवळ 'एटीएम' सेवा सुरू करण्याचा मानस बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
अंबरनाथमध्ये आयसीआयसीआय बँकेची पालेगाव येथे तिसरी शाखा सुरू झाली आहे. आरबीआयच्या पब्लिश डेटानुसार अंबरनाथचे २० वर्षांपूर्वी २७०० करोड रुपयांचे मार्केट होतं, आज ४ हजार २०० करोड रुपयांचे मार्केट आहे. नव्याने विस्तारित शहरांपैकी नेरूळ,खारघर,नवी मुंबई, ठाण्यातील मानपाडा, कोपरीच्या बरोबरीने 'पालेगाव सिटी' विस्तारात आहे. अनेक गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. नव्याने सुरू आहेत. या सर्वांना आयसीआयसीआय बँक ही ग्राहकांना, गुंतवणूकदारांना उत्तम सेवा देईल असा विश्वास शाखा व्यवस्थापक मनीष शर्मा यांनी व्यक्त केला. शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाखा व्यवस्थापक मनीष शर्मा, उपशाखा व्यवस्थापक दुर्गेश परदेशी, प्रादेशिक प्रमुख कुणाल ठाकूर, मुख्य नोडल ऑफिसर शार्लेट मालवणकर आदी बँक अधिकाऱ्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


