इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनमार्फत शिक्षणाधिकाऱ्यांचे आभार
दिवा \आरती परब: इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने काल ठाणे महानगरपालिका शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांची भेट घेऊन दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्या संदर्भात पथक स्थापन केल्याबद्दल आभार मानण्यात आले.
संघटनेतर्फे अनेक वर्षापासून दिव्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करावी, यासाठी ठाणे महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. परंतु सदर शाळांवर कोणतीही कारवाई न होता या शाळांची संख्या दिव्यात झपाट्याने वाढत आहे.
पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे व शिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी यावर्षी मात्र अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी थेट पालक संपर्क मोहीम हाती घेतली असून त्यासाठी नऊ पथके स्थापन केली आहेत. ही पथके सर्व अनधिकृत शाळांना भेटी देऊन तेथील पालकांशी संपर्क करत आहेत. व पालकांना त्यांच्या पाल्यांचे नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा प्रवेश सदर अनाधिकृत शाळेत न करता नजीकच्या मान्यता प्राप्त शाळांमध्ये करण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी यासाठी सदर पालकांना मदत व समुपदेशन या पथकांमार्फत होणार आहे.
सदर पथकात गटप्रमुख केंद्र समन्वयक व साधन व्यक्ती यांचा समावेश असून असून त्यांना प्रत्येकी अंदाजे ७/८ अनधिकृत शाळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. तसेच सदर अनधिकृत शाळा २०२५-२६ मध्ये सुरु राहणार नाहीत याची खबरदारीही घ्यायची जबाबदारी त्या पथकावर आहे. तसेच या अनधिकृत शाळांवर कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची माहिती म्हेत्रे यांनी संघटनेला दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ म्हात्रे सर, संघटनेचे पदाधिकारी उत्तम सावंत सर, स्वप्निल गायकर सर, सुरेंद्र यादव सर, आदित्य पाटील सर व ॲड. सुभाष पाल सर उपस्थित होते.
