ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक अशा आघाडीच्या बँकांसोबत सहयोग आणि सुलभ आर्थिक व्यवस्थापनासाठी अनेक टूल्स
ठाणे : टॅली सोल्यूशन्स प्रा. लि. या भारतातील आघाडीच्या व्यवसाय ऑटोमेशन सॉफ्टवेअर प्रदाता कंपनीने त्यांचे नवीन रीलीज टॅलीप्राइम ६.० लाँच केले आहे. जे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेज (एसएमई)करिता आर्थिक कार्यसंचालने सोपी करण्यासाठी, तसेच कनेक्टेड बँकिंग अनुभवाच्या माध्यमातून विनासायास करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या प्रगत अपग्रेडने व्यवसाय व अकाऊंटण्ट्ससाठी बँक रिकन्सिलिएशन, बँकिंग ऑटोमेशन आणि आर्थिक व्यवस्थापनामध्ये क्रांती घडवून आणली आहे. ई-इनवॉईसिंग, ई-वेल बिल जनरेशन व जीएसटी कम्प्लायन्स अशा कनेक्टेड सेवा देण्यामधील आपल्या कौशल्याला अधिक दृढ करत टॅलीने एसएमईंना एकीकृत बँकिंग क्षमतांसह सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. हे नवीन रीलीज व्यवसायांना त्यांच्या इकोसिस्टमशी कनेक्ट करण्याप्रती, तसेच त्यांना अद्वितीय सुलभतेसह ऑपरेट करण्यास सक्षम करण्याप्रती टॅलीची कटिबद्धता अधिक दृढ करते.
एमएसएमई मंत्रालयाच्या मते, भारतात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एमएसएमई आहेत. नवीन लाँच, टॅलीचा राज्यातील व्यापक एमएसएमई परिसंस्थेला पाठिंबा देण्याचा मनसुबा आहे. भारतातील एकूण एमएसएमई उत्पादनात राज्याचा वाटा जवळपास १३ टक्के आहे, जो रोजगार निर्मिती, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, स्थानिक अर्थव्यवस्था आणि देशाच्या जीडीपीमध्ये भर घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. राज्यातील वाढत्या एमएसएमई परिसंस्थेसह डिजिटायझेशन अत्यावश्यक बनले आहे आणि टॅली सोल्यूशन्स उद्योगासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब सक्रियपणे करत आहे.
व्यवसाय नेटवर्क विनासायास करण्याप्रती आपल्या दृष्टिकोनाशी बांधील राहत टॅलीप्राइमचे कनेक्टेड बँकिंग वैशिष्ट्य टॅलीमध्ये बँकांना आणत एकीकरणाला नव्या उंचीवर नेते. अकाऊंटिंग व बँकिंगला एकाच सिस्टममध्ये आणत, तसेच ॲक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँक यांच्यासोबत सहयोगांच्या माध्यमातून सुरक्षित लॉगइन व रिअल-टाइम कनेक्टीव्हीटीसह वापरकर्त्यांना प्रत्यक्ष प्लॅटफॉर्ममध्ये लाइव्ह बँक बॅलेन्सेस व व्यवहारांबाबत अपडेट्स मिळू शकतात, ज्यामधून त्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाबाबत अपडेटेड माहिती मिळते, तसेच व्यवसाय स्मार्टर आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम होतात. टॅलीमध्ये पेमेंट प्रक्रिया करण्याची, व्यवहारांचे त्वरित समन्वय साधण्याची आणि बँक बॅलन्सचे निरीक्षण करण्याची क्षमता असल्याने व्यवसाय गतिशील राहू शकतात, संसाधनांना ऑप्टिमाइज करू शकतात आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकतात.
टॅलीप्राइम ६.० लाँच करताना टॅली सोल्यूशन्सचे भारतातील व्यवसायाचे प्रमुख जॉइस रे म्हणाले, “टॅलीप्राइम ६.० प्लॅटफॉर्ममध्ये बँकिंगचे विनासायासपणे एकत्रीकरण करून लहान व मध्यम व्यवसायांसाठी आर्थिक ऑपरेशन्स सुलभ आणि मजबूत करण्यासाठी डिझाइन केले आहे. लाइव्ह बँक बॅलन्स, ऑटोमेटेड रिकन्सिलिएशन आणि रिअल-टाइम ट्रान्झॅक्शन अपडेट्स सारख्या वैशिष्ट्यांसह व्यवसाय आता सिस्टम स्विच न करता त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करू शकतात, ज्यामुळे त्यांचा ३०-५० टक्के वेळ वाचेल. हे प्रकाशन एसएमईंना चपळ राहण्यास, वेळ वाचवण्यास आणि त्यांच्या ऑपरेशन्सवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी आहे. ते खेळते भांडवल ऑप्टिमायझेशन, कनेक्टेड ई-इनव्हॉइसिंग आणि ई-वे बिल जनरेशनद्वारे प्रबळ जीएसटी अनुपालन यांसारख्या क्षमता देखील देते, हे सर्व गुंतागूंती कमी करण्यासाठी आणि व्यवसाय मालकांना वाढ व नाविन्यतेवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.'
टॅलीप्राइमचे स्मार्ट बँक रिकन्सिलिएशन बँकिंग व्यवहारांसोबत आर्थिक रेकॉर्ड्सना विनासायासपणे एकीकृत करत एसएमई व अकाऊंटण्ट्सच्या बुक्सचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींमध्ये बदल घडवून आणते. जलदपणे रिकन्सिलिएशन, ऑडिट्ससाठी वेळेवर अकाऊंट फायनलायझेशन आणि रिअल-टाइम ऑपरेशनल इनसाइट्स अशा सर्व सेवा युनिफाईड, सर्वोत्तम प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच, एकीकृत करण्यात आलेले यूपीआय पेमेंट्स व पेमेंट लिंक्स संकलन सहजपणे करतात, ज्यामधून सुलभ रोखप्रवाहाची खात्री मिळते.
टॅलीप्राइम ६.० मध्ये सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे, जेथे एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शन, मल्टी-लेयर्ड ॲक्सेस कंट्रोल आणि रिअल-टाइम फ्रॉड डिटेक्शन यांचा समावेश आहे. यामधून सुरक्षित बँकिंग व्यवहारांची खात्री मिळते. हे लाँच ग्राहकांच्या आर्थिक डेटाची परिपूर्ण सुरक्षितता व गोपनीयतेची खात्री घेण्याप्रती कंपनीच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
टॅली प्रगत तंत्रज्ञानासह व्यवसाय व्यवस्थापनामध्ये सुधारणा करत आहे, टॅलीप्राइम ६.० च्या माध्यमातून विनासायास व सर्वांगीण अनुभव देत आहे. कनेक्टेड जीएसटी व ई-इनवॉईसिंगपासून व्हॉट्सॲप-बेस्ड अलर्ट्स (डब्ल्यूएबीए), क्लाऊड ॲक्सेस आणि इंटीग्रेटेड फायनान्सिंगपर्यंत टॅली व्यवसायांना सुलभ कार्यसंचालनांसाठी सोप्या, कार्यक्षम व कनेक्टेड सोल्यूशन्ससह सक्षम करते.