दिवा \ आरती परब : प्रभू श्रीराम नवमी निमित्त दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवा स्टेशन बाहेर भव्य प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती उभारुन त्याची पूजा अर्चना केल्यावर प्रभू श्रीरामाचा महिला भक्तांकडून पाळणा देखील गायला गेला. यावेळी भाविकांनी, दिवेकरांनी पूजा आणि आरतीसाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाचे आयोजन दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे, दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, महिला विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केले होते.
या महाआरतीला कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, जिल्हा महिला संघटिका वैशाली राणे– दरेकर, विधानसभा संघटिका योगिता नाईक, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, युवा शहराधिकारी अभिषेक ठाकूर, विभाग प्रमुख शनिदास पाटील, संजय जाधव, उपविभाग प्रमुख योगेश निकम, संदीप राऊत, अशोक अमोंडकर, संजय अर्दाळकर, राजेश गोपने, धनाजी पोवार, महेश शीतकर, राजश्री मुंडे, कल्पिता मुंडे, सुहासिनी गुडेकर सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आदी उपस्थित होते.
