दिवा- मुंब्रा रेल्वे अपघातात दिव्यातील राहुल गुप्ताचा मृत्यू


दिवा \ आरती परब :  दिवा- मुंब्रा रेल्वे अपघातात दिव्यात राहणाऱ्या २८ वर्षीय राहुल गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून दिव्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथे जाऊन त्याच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

राहुल गुप्ता हा दिवा पूर्वेला डी. जी. कॉम्प्लेक्स येथे आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याच्या परिवारात आई वडील, दोन बहिणी व एक लहान भाऊ सदस्य आहेत. राहुल मुंबई येथे स्टेशनरी दुकानात कामाला जात होता.
राहुलच्या मृत्यूची बातमी मिळताच शिवसेना उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत, विभागप्रमुख उमेश भगत, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे जाऊन राहुलच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केले.

Post a Comment

Previous Post Next Post