जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली खासदार उज्ज्वल निकम यांची भेट



जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांनी राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची औपचारिक सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती, केंद्र सरकारच्या विविध केंद्रीय व प्रायोजित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा तसेच विकासकामांच्या प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा झाली.

 खासदारांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राच्या योजनांच्या चौकटीत नव्या विकासपर्यायांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच विकास गतीमान करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सहकार्याची ग्वाही दिली.



#Jalgaon #DistrictCollector #AyushPrasad #UjjwalNikam #Development


Post a Comment

Previous Post Next Post