मालमत्ता हस्तांतरण शुल्क आकारणीतील बदल

Maharashtra WebNews
0


 अधिक पारदर्शक व नागरिकांसाठी सोयीस्कर धोरण लागू


नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता हस्तांतरण शुल्क आकारणीच्या धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असून, यामुळे शुल्क आकारणी अधिक पारदर्शक होणार आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मंजुरीनंतर हा निर्णय ७ जुलै २०२५ पासून लागू झाला आहे.


मुख्य बदल

शुल्क निश्चिती रेडीरेकनरवर आधारित असेल.

वारसा प्रकरणांमध्ये केवळ ₹५०० किंवा मुद्रांक शुल्क (जे कमी असेल) आकारले जाणार.

विलंब शुल्काची नवी तरतूद १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू.

विलंब शुल्क = चालू वर्षाच्या एप्रिलमधील RBI लेडींग रेट + ३% वार्षिक.

नोंदणीकृत दस्तऐवज, कंपनी नाव/पॅन बदल, बाजारमूल्य नोंद नसलेले दस्त, अपवादात्मक प्रकरणे यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे.



महापालिकेने सर्व मालमत्ता धारकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, सविस्तर माहिती www.nmmc.gov.in वर उपलब्ध आहे.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)