एन्युमरेशन ब्लॉक (EB) डेटा उपलब्ध करून द्यावा

 


ठाण्यातील सर्व पक्षीय नेत्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण मुद्द्यावर गुरुवारी चर्चा रंगली. या प्रारूप रचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. यानिमित्ताने झालेल्या सुनावणीत एन्युमरेशन ब्लॉक (EB) डेटा उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार राजन विचारे यांनी या सुनावणीत ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे ठाम मागणी करताना सांगितले की, “EB डेटा हा एक खुला दस्तऐवज आहे आणि तो नागरिकांना पारदर्शकतेसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.”



या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मनसे नेते व ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख व प्रवक्ते अनिष गाढवे उपस्थित होते.

नेत्यांनी एकमुखाने ठाण्यातील प्रभाग रचना प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, तसेच नागरिकांना आवश्यक माहिती वेळेवर व योग्य स्वरूपात द्यावी, अशी मागणी केली.





Tags :  #thane #municipalcorporation #shivsenaubt #mashal #mns #ncpspeaks #congress #enumerationblocks #maharashtra


Post a Comment

Previous Post Next Post