प्रभाग २७ मध्ये शैलेश पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

 



चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल

दिवा \ आरती परब : दिवा शहरातील प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेनेचे उपशहर प्रमुख तथा अधिकृत उमेदवार शैलेश मनोहर पाटील यांनी दिवा स्टेशनजवळील आपल्या कार्यालयातून मोठ्या उत्साहात रॅली काढत मुंब्र्यात येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो पदाधिकारी, विभाग प्रमुख, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. जल्लोषात व शक्तीप्रदर्शन करत काढलेल्या मिरवणुकीने परिसराचे लक्ष वेधून घेतले.


सलग तीन वेळा प्रभागातून निवडून आलेल्या शैलेश पाटील यांचा आज चौथ्यांदा अधिकृत एबी फॉर्म दाखल झाल्याने समर्थकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. “पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे,” अशी भावना यावेळी शैलेश पाटील यांनी व्यक्त केली.


उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रभाग २७ मध्ये पुन्हा विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजी केली. या शक्तीप्रदर्शनामुळे दिव्यातील निवडणूक वातावरण अधिक तापल्याचे चित्र दिसून आले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post