ज्येष्ठ शिवसैनिक ब्रम्हा पाटील यांचा सहभाग
जयजय महाराष्ट्र माझा’ म्हणत शक्तिप्रदर्शन
दिवा \ आरती परब : शिवसेना दिवा शहर प्रभाग क्रमांक २७ मधील प्रचाराचा शुभारंभ आज ज्येष्ठ शिवसैनिक ब्रम्हा सखाराम पाटील आणि इतर ज्येष्ठांच्या हस्ते नारळ फोडून झाला. तर दिवा गावातील कुलस्वामीनी मंदिरात देवीआईचे माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश मनोहर पाटील, उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत, माजी नगरसेवक अमर ब्रम्हा पाटील, माजी नगरसेविका दिपाली उमेश भगत, भाग्यश्री गुरुनाथ पाटील आणि तेजस्वी भालचंद्र भगत या सर्वांनी दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी ‘जयजय महाराष्ट्र माझा’ या गीताच्या गजरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आजच्या प्रचार रॅलीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायली मिळाली.
यानंतर दिव्यातील कुलस्वामीनी मंदिरापासून हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर नंतर दिवा स्टेशन पूर्वेतील इच्छितेश्वर मंदिर, साबेगावातील साई मंदिर, शंकर मंदिर, जीवदानी आई देवी मंदिर पर्यंत भव्य शुभारंभ प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅली दरम्यान दिवा गावातील शैलेश पाटल यांच्या ऑफिसचे उद्घाटन ही त्यावेळी करण्यात आले. तर प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जमलेल्या उत्स्फूर्त गर्दीमुळे प्रभाग क्रमांक २७ मधील सर्व नगरसेवक निवडूनच आल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत होता.
या वेळी शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक शैलेश पाटील, उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत, माजी नगरसेवक अमर ब्रम्हा पाटील, माजी नगरसेविका दिपाली भगत, भाग्यश्री पाटील, तेजस्वी भगत, विभागप्रमुख भालचंद्र भगत, उमेश भगत, समाजसेवक कैलाश पाटील, उपविभागप्रमुख महेश शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यातील विकासकामांचे सातत्य राखण्यासाठी आणि स्थानिक समस्या मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या भव्य प्रतिसादामुळे शिवसेना आता पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

