ठाणे महानगरपालिका महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्याची मागणी

 


भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी यांचे महापौरांना पत्र

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी भाजपाच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. २३ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोंधळानंतर महासभेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता असावी आणि नागरिकांना थेट माहिती मिळावी, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.


२३ फेब्रुवारीच्या महासभेत काही मुद्द्यांवरून गदारोळ झाला होता. काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना व प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत. तसेच जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून स्पष्ट खुलासा न मिळाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे कोळी यांनी पत्रात नमूद केले आहे. सभेतील कामकाजाबाबत अनेक नागरिकांनी माहिती विचारली; मात्र लोकप्रतिनिधी असूनही त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


सुमारे चार वर्षांनंतर ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या राजवटीला सुरुवात झाली असून नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महासभेत मांडण्यात येणाऱ्या लक्षवेधी सूचना, प्रस्ताव, प्रश्नोत्तरे, चर्चेनंतर घेतलेले निर्णय तसेच प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती यामध्ये पारदर्शकता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या पार्श्वभूमीवर ५ मार्चपासून होणाऱ्या महासभांचे अधिकृत ऑनलाईन थेट प्रक्षेपण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त सौरभ राव आणि सचिव मनिष जोशी यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.


 #namratakoli #thane #thanekar #TMC #TMCNews #BJPThane

Post a Comment

Previous Post Next Post