मुंबई, : वाढत्या तापमान आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर एअर कंडिशनिंगच्या गरजा आता केवळ थंडाव्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. याच गरजांचा विचार करून सॅमसंगने ‘बेस्पोक एआय विंडफ्री’ एअर कंडिशनर्सची २०२६ ची नवी श्रेणी सादर केली आहे.
या नवीन लाइनअपमध्ये एकूण २३ मॉडेल्स असून ४-स्टार व्हेरिएंट्सचा समावेश आहे. कूलिंग कार्यक्षमता, ऊर्जा बचत आणि प्रीमियम डिझाइन यावर विशेष भर देण्यात आला आहे. भारतीय कुटुंबांच्या विविध गरजा लक्षात घेऊन ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.
या एसीमध्ये एआय-आधारित कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, खोलीतील तापमान, आर्द्रता आणि वापरकर्त्यांच्या सवयी लक्षात घेऊन कूलिंग आपोआप समायोजित होते. ‘विंडफ्री’ तंत्रज्ञानामुळे थंड हवा थेट न लागता सौम्य आणि संतुलित थंडावा मिळतो.
मान्सूनच्या काळात उपयुक्त ठरणारा ‘ड्राय कम्फर्ट’ मोड हवेतली आर्द्रता नियंत्रित ठेवतो, तर ‘एआय फास्ट’ आणि ‘विंडफ्री कूलिंग+’ फीचरमुळे झटपट थंडावा निर्माण होतो.
स्मार्ट फीचर्सच्या दृष्टीनेही हा एसी आधुनिक आहे. ‘स्मार्टथिंग्ज’ इंटीग्रेशनमुळे स्मार्टफोनद्वारे तसेच बिक्सबी, ॲलेक्सा आणि गुगल असिस्टंटसारख्या व्हॉइस असिस्टंटद्वारे एसी सहज नियंत्रित करता येतो. ‘एआय एनर्जी मोड’मुळे सुमारे ३० टक्क्यांपर्यंत वीज बचत होते.
टिकाऊपणाच्या दृष्टीने कंपनीकडून ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि एआय इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. या एसीची किंमत ३२,४९० रुपयांपासून सुरू होत असून, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. स्मार्ट आणि कार्यक्षम कूलिंग अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा यामागील उद्देश आहे.
