सॅमसंगची नवी गॅलेक्सी झेड सिरीज भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध

 


मुंबई : सॅमसंगने आपल्या नवीन फोल्डेबल स्मार्टफोन श्रेणीतील गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ हे स्मार्टफोन भारतात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सात पिढ्यांच्या फोल्डेबल इनोव्हेशनवर आधारित या नव्या सिरीजमध्ये गॅलेक्सी एआय आणि जेमिनी इंटेलिजन्सच्या माध्यमातून अधिक वैयक्तिक, उत्पादक आणि स्मार्ट अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे.

गॅलेक्सी झेड फोल्ड८ हा ४८०० एमएएच बॅटरीसह २०१ ग्रॅम वजनाचा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात हलका फोल्ड डिव्हाइस असल्याचा कंपनीचा दावा आहे. ३००० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, ड्युअल ५० मेगापिक्सल कॅमेरा आणि विविध एआय-आधारित फीचर्समुळे कंटेंट पाहणे, गेमिंग आणि निर्मितीसाठी हा फोन उपयुक्त ठरणार आहे.

तर गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रामध्ये ८ इंचांचा मुख्य डिस्प्ले, २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ८के व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्नॅपड्रॅगन ८ एलिट जेन ५ फॉर गॅलेक्सी प्लॅटफॉर्म देण्यात आला आहे. ५००० एमएएच बॅटरी आणि ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह हा फोन उत्पादकता आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे.

गॅलेक्सी झेड फ्लिप८ हा १८० ग्रॅम वजनाचा आणि ६.१ मिमी पातळ असलेला सॅमसंगचा सर्वात स्लिम आणि हलका फ्लिप डिव्हाइस असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ५० मेगापिक्सल कॅमेरा, एआय-नेटिव्ह फ्लेक्सविंडो, फ्लेक्स मोड, फ्लिपशॉट आणि कव्हर स्क्रीन मिरर यांसारख्या फीचर्समुळे वापरकर्त्यांना फोटोग्राफी आणि हँड्स-फ्री अनुभव मिळणार आहे.

नवीन सिरीजमध्ये नाऊ ब्रीफ, नाऊ नज आणि जेमिनी इंटेलिजन्स यांसारख्या एआय सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच सॅमसंग नॉक्स, नॉक्स वॉल्ट आणि प्रायव्हसी अलर्ट्सच्या माध्यमातून डेटा सुरक्षा व गोपनीयतेवरही विशेष भर देण्यात आला आहे.

किंमती अशा

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्राची किंमत ₹१,९९,९९९ पासून, गॅलेक्सी झेड फोल्ड८ ची किंमत ₹१,७९,९९९ पासून, तर गॅलेक्सी झेड फ्लिप८ ची किंमत ₹१,२४,९९९ पासून सुरू होते. विविध स्टोरेज व्हेरिएंटनुसार किंमती वाढतात.

प्री-ऑर्डरवर आकर्षक ऑफर्स

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा आणि फोल्ड८ वर ₹१०,००० पर्यंत अपग्रेड ऑफर किंवा ₹९,००० बीसीबी/यूपीआय ऑफर, तर गॅलेक्सी झेड फ्लिप८ वर ₹५,००० अपग्रेड ऑफर किंवा ₹४,००० बीसीबी/यूपीआय ऑफर उपलब्ध आहे. याशिवाय शून्य डाउन पेमेंटसह ३० महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट एनबीएफसी ईएमआय किंवा ९ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट बँक ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post