इनाल्साचे २८०० वॅट ड्युअल-झोन एअर फ्रायर लॉन्च
मुंबई : भारतातील अग्रगण्य होम अप्लायन्सेस ब्रँड INALSA ने आधुनिक किचनसाठी उपयुक्त ठरणारे ‘न्यूट्रि फ्राय ड्युओस्लिम: द ड्युओ-स्टॅक १४ लिटर प्रोफेशनल एअर फ्रायर’ बाजारात लॉन्च केले आहे. सुमारे ₹१३,९९९ किंमतीचे हे उपकरण Amazon, Flipkart तसेच देशभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध झाले आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एकाच वेळी अनेक पदार्थ बनवण्याची गरज वाढत आहे. हीच गरज लक्षात घेऊन इनाल्साने हे एअर फ्रायर विकसित केले असून, यामध्ये ड्युअल-झोन कुकिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे वापरकर्त्यांना दोन वेगवेगळ्या बास्केटमध्ये स्वतंत्र तापमान आणि वेळ सेट करून एकाच वेळी दोन पदार्थ तयार करता येतात.
या एअर फ्रायरमध्ये एकूण १४ लिटर क्षमता असून, त्यात दोन स्वतंत्र ७-७ लिटरचे बास्केट देण्यात आले आहेत. प्रत्येक बास्केटमध्ये १४०० वॅट हीटिंग सिस्टम असून एकत्रितपणे हे उपकरण २८०० वॅट पॉवर आउटपुट देते. त्यामुळे पदार्थ जलद आणि समप्रमाणात शिजतात. तसेच, ८० ते २०० अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नियंत्रित करता येते.
यातील सिंक फिनिश टेक्नॉलॉजी हे आणखी एक खास वैशिष्ट्य असून, वेगवेगळ्या वेळेत तयार होणारे पदार्थही एकाच वेळी पूर्ण होतील याची खात्री करते. याशिवाय, इनबिल्ट रोस्टिंग रॅक सिस्टममुळे एकाचवेळी चार पदार्थ तयार करण्याची सुविधा मिळते.
वापर सुलभ करण्यासाठी या एअर फ्रायरमध्ये पारदर्शक व्ह्यूइंग विंडो आणि इनबिल्ट लायटिंग देण्यात आले आहे, ज्यामुळे ड्रॉवर न उघडताही पदार्थ शिजत असल्याचे पाहता येते. तसेच, यात १० प्रीसेट कुकिंग मोड्स आणि अॅडजस्टेबल स्मार्ट डिस्प्ले दिलेले आहे.
या उत्पादनाचे व्हर्टिकल ड्युअल-स्टॅक डिझाइन विशेष लक्षवेधी ठरते. हे डिझाइन कमी जागेत बसणारे असून, शहरातील छोट्या किचनसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे.
एकूणच, इनाल्साचे हे नवीन एअर फ्रायर आधुनिक कुटुंबांसाठी जलद, स्मार्ट आणि मल्टी-टास्किंग कुकिंग सोल्यूशन म्हणून बाजारात चर्चेत येण्याची शक्यता आहे.