दिवा \ आरती परब: रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिवा स्टेशन पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक शैलेश पाटील यांना हजारो भगिनींनी राखी बांधून सण साजरा केला. सकाळपासूनच मोठ्या संख्येने महिलांनी, ज्येष्ठांपासून लहान मुलींपर्यंत, उत्साहाने सहभागी होत रक्षाबंधन करुन भावबंध दृढ केला.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला. राखी बांधताना महिलांनी आपल्या परिसरातील विविध समस्या शैलेश दादांना सांगितल्या. यावर दादांनी “भावाच्या नात्याने लवकरच त्या भागात येऊन या समस्या सोडवू” असे आश्वासन दिले.
“एवढ्या मोठ्या प्रमाणात भगिनी आपुलकीने येऊन राखी बांधतात, मला निवडणुकीत जिंकून याल असा आशीर्वाद देतात आणि माझ्यावर विश्वास दाखवतात, हे माझ्यासाठी भाग्याचं आहे,” अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या या उपक्रमात प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
पायल पाटील, भगिनी - गेली कित्येक वर्षे आम्ही शैलेश दादाला राखी बांधायला येतो. स्वतः भावाला राखी बांधण्याआधी आम्ही दादाला राखी बांधतो. दिव्यात आम्ही राहायलो आलो तेव्हा पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. ती अडचण दादांनी सोडवल्याने आमची महिलांची दगदग थांबली. त्यामुळे दादाच्या सर्व उपक्रमाला आम्ही सर्व महिला आवर्जून उपस्थित राहतो.
