डॉ. रघुनाथ माशेलकर बालवैज्ञानिक स्पर्धेत एकूण 68 प्रकल्प
डोंबिवली : स्वामी विवेकानंद विद्या मंदिर विष्णू नगर येथील डॉ. हेडगेवार सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे १९ वी आंतरशालेय डॉ. रघुनाथ माशेलकर बालवैज्ञानिक स्पर्धेत प्राथमिक विभागाचे 33 विद्यार्थी व माध्यमिक विभागाचे 35 विद्यार्थी असे एकूण 68 प्रकल्प या अंतिम फेरीमध्ये मांडले गेले. विद्यार्थ्यांनी लेझर सिस्टीम, शेती, संरक्षण, मॅग्नेट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्लोबल वॉर्मिंग अशा विविध विषयांवर प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केले होते.संस्था पदाधिकारी दांडेकर यांनी स्पर्धेतील चौथी फेरी यशस्वीपणे पार पाडलेल्या 77 बालवैज्ञानिकांनी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे नाव उज्वल करावे अशी आशा व्यक्त केली.
राष्ट्रीय शिक्षण संस्था सदस्या तसेच डॉ. रघुनाथ माशेलकर स्पर्धा प्रमुख डॉ. सरोज कुलकर्णी म व स्वा. वि. वि.विष्णुनगर शाळा समिती सदस्य मा.दांडेकर सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि परीक्षक यांच्या उपस्थितीत डॉ. रघुनाथ माशेलकर स्पर्धेची शेवटची चौथी फेरी प्रकल्प मांडणी संपन्न झाली .डॉ रघुनाथ माशेलकर स्पर्धेची प्रथम फेरी, द्वितीय फेरी ,गटचर्चा या तीन फेऱ्या यशस्वी पार पाडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी डॉ. हेडगेवार सभागृहात प्रकल्प मांडणी केली.
स्पर्धेसाठी डॉ. केतकी भातखंडे , डॉ. श्रुती बर्वे, केतन पिंपूटकर, रमाकांत बारी,सौरव दोसी , यज्ञेश निकम , स्नेहल चौधरी , राहुल चौधरी हे सर्व आपल्या विविध शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धाप्रमुख सरोज कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकल्प मांडणी कक्षाची उद्घाटन फीत कापून केले .परीक्षकांनी प्रकल्पाचे परीक्षण करून प्रकल्पासंदर्भात विविध प्रश्न विचारले .प्रकल्पात असलेल्या त्रुटी विद्यार्थ्यांना स्पष्ट करून त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवले. विद्यार्थ्यांनी जो प्रकल्प तयार केला आहे, त्या संदर्भात विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ,विज्ञानासंदर्भात जिज्ञासा तपासली गेली. चार फेऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या 77 स्पर्धकांना प्रमाणपत्र व पेन देऊन त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक मान्यवर व परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.राजेंद्र साठे,साक्षी पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगतातून डॉ .माशेलकर स्पर्धेमुळे विज्ञानाची आवड, अवांतर वाचनाची सवय लागल्याचे सांगितले .शिक्षक मनोगत रंजना मोरे मॅडम केले .परीक्षक केतकी भातखंडे मॅडम ,यज्ञेश निकम सर , केतन पिंपूटकर,सौरभ दोसी यांनी आपले मनोगत मांडले.त्यांनी विद्यार्थ्यांना गूगल, यूट्यूब ऐवजी वैज्ञानिक कोश, संदर्भ पुस्तके ,शास्त्रज्ञांची चरित्रे वाचण्याचा सल्ला दिला.
माहितीचे रूपांतर ज्ञानात करा असा संदेश परीक्षकांनी मनोगतातून दिला. या स्पर्धेमुळे अनेक बालवैज्ञानिक निर्माण झाले असे त्यांनी सांगितले .संस्था सदस्या डॉ. सरोज कुलकर्णी यांनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विज्ञान शोधा, दैनंदिन जीवनात विज्ञानाचे उपयोजन करा हा संदेश दिला कार्यक्रमाचे ऋणनिर्दे सविता बहाळकर यांनी केले. डॉ रघुनाथ माशेलकर स्पर्धेचे संपूर्ण नियोजन स्पर्धाप्रमुख मुख्या.मा. राजश्री कांबळे मॅडम व मा. प्रभारी मुख्याध्यापक डुंबरे यांनी केले. रघुनाथ माशेलकर बाल वैज्ञानिक स्पर्धेतून नक्कीच भविष्यात डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारखे वैज्ञानिक निर्माण करण्याचे बीज राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून पेरले जात आहे. सरोज कुलकर्ण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मधुरा सावंत यांनी केले.कार्यक्रमाची सांगता नयना पाटील यांच्या वंदे मातरमने झाली.

