सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनचे दिनदर्शिका प्रकाशित


मुंबई : येत्या नव वर्षासाठी सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनने सन २०२३ दिनदर्शिकेचे सलुन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय चव्हाण यांच्या हस्ते सतंसेना सभागृह दादर येथे प्रकाशित करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमाला  महाराष्ट्र प्रभारी उदय टक्के, महाराष्ट्र सरचिटणीस किसनराव कोर्हाळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश रणदिवे, मुंबई अध्यक्ष तुषार चव्हाण, मुंबई उपाध्यक्ष संदिप बदिरके,अनिल पवार, ठाणे अध्यक्ष रमेश चव्हाण, ठाणे सचिव मंदार राऊत, ठाणे समन्वय बंधु चव्हाण तसेच समाजातील प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      दोन वर्ष करोनामुळे कुठलेही कार्यक्रम घेता आले नाही.   दिनदर्शिकेचा इतिहास जुना असला तरी काळाच्या प्रवाहाबरोबर तिचे स्वरूप बदलले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाकी झालेली समाजाची विकास प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती  संदीप बदिरके  यांनी दिली. यावेळी यु टक्केज् ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात जी परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीवर एक पथ नाट्य सादर केले. पथ नाट्य पाहून सगळेच भाऊक झाले.

Post a Comment

Previous Post Next Post