तुकाराम मुंढे यांची पुनर्नियुक्ती करा !

 


प्रज्ञा फाऊंडेशनची मागणी
 











मुंबई : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे त्यांच्या अनोख्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांची नियुक्ती होताच प्रशासन सुतासारखे सरळ होऊन सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतात. अशाच कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची आवश्यकता आरोग्य विभागाला असल्याने त्यांची पुन्हा आरोग्य आयुक्त पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी प्रज्ञा फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मुंढे यांची धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी येताच त्यांनी राज्यात दौरे सुरु केले. बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी खास शैलीत इशारा दिला होता. परंतु काही दिवसातच त्यांची बदली करण्यात आली. 
मुंडे यांची बदली रद्द करून त्यांची पुनर्नियुक्ती करावी, अशी मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रज्ञा फाऊंडेशनने केली आहे. या शिष्टमंडळात फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, परेश मोटे, बाबासाहेब साबळे, विमलताई शरणांगत, सुशांत साबळे, सुशील शरणांगत आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post