डोंबिवली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार 'ह'प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा येथील बांधकामधारक मनोज दत्तात्रय म्हात्रे व इतर यांची तळ + ७ मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई 'फ'प्रभाग सहाय्यक आयुक्त भरत पाटील, अनधिकृतबांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने आणि ३ ब्रेकर, ३० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

