ठाकुर्ली: ठाकुर्ली रेल्वे पूर्व येथे पादचारी पुलाजवळ सरकता जिना बसवत आहे.परंतु सदरचा जिना चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी बनविण्यात येत आहे.तसेच जर का हा सरकता जिना तिथेच बनवला तर त्याचा खर्च वाढु शकतो तसेच सदरच्या जिन्या मुळे वाहतुकीचा पुल जो पुढे ९०फिट पर्यंत जाणार आहे त्याला अडथळा होवु शकतो.व त्याचाही खर्च वाढु शकतो असे बाळासाहेब शिवसेना विभागप्रमुख समीर कवडे यांनी सांगितले. कवडे पुढे म्हणाले,या कामात त्रुटी दिसत असल्याने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास आणुन देण्यासाठी सदरचा पत्र व्यवहार केला आहे.तसेच त्याची प्रत संबंधीत मध्य रेल्वे डि.आर.एम मुंबई व पालिकेच्या शहर अभियंता यांनाही दिली आहे.
Tags
महाराष्ट्र
