आता रूटही दिसणार आयपीएलच्या रणांगणात!

  • राजस्थानने कोटी रुपयांना विकत घेत आयपीएलमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकार केले

कोची :  आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी कोचीमध्ये पार पडला. आयपीएलच्या कुंभ मेळ्यामध्ये इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रुट देखील झाला आहे. पाच वर्षानंतर रूटचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न यावेळी पूर्ण झाले.या लिलावासाठी त्याची आधारभूत किंमत कोटी इतकी होती. लिलावाच्या पहिल्या फेरीत त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. मात्र तिसऱ्या फेरीमध्ये राजस्थान रॉयल्सने कोटी रुपयांना विकत घेत त्याला आपल्या संघात जागा दिली. त्यामुळे रूटचे आयपीएल मध्ये सहभागी होण्याचे स्वप्न साकार झाले.

जो रूट याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणले जाते. मात्रतो अद्याप कधीही आयपीएलमध्ये खेळला नव्हता. कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने आयपीएलपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. 2018 आयपीएल लिलावावेळी त्याने आपले नाव नोंद केले होते. मात्रकोणत्या संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवलेला नव्हता.

यावेळी मात्र स्वतः रूटने आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. एका मुलाखतीत त्याने आयपीएल ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा असून त्याचा भाग व्हायला आपल्याला आवडेलअसे म्हटले होते. इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर हा देखील राजस्थान संघात आहे.

जो रूट हा 2016 टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता.

 


Post a Comment

Previous Post Next Post