पेरणे: कोरोनाच्या दोन वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा 205 व्या शौर्य दिनानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक हे भीमा कोरेगांव येथे दाखल झाले असून विजयस्तंभाला अभिवादनासाठी मोठी गर्दी करत आहे.
पेरणे ता. हवेली येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्यादरम्यान 1 जानेवारी रोजी पहाटे धम्मयाचना, सकाळी भारतीय बौद्ध महसभा सामुदायिक बुद्ध वंदना करण्यात आली. मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समता सैनिक दल, महार बटालियन सेवानिवृत्त सैनिक यांच्याकडून सलामी व मानवंदना कार्यक्रम झाला. काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायींनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली आहे.

.jpeg)