- १० व्यांदा बनला ऑस्ट्रेलियन ओपन विजेता
- २२-२२ जेतेपदाबरोबर राफेल नदालशी बरोबरी
सिडनी: रविवारी खेळल्या गेलेल्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत सर्बियाच्या टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचने ग्रीक खेळाडू स्टेफानोस त्सित्सिपासचा ६-३, ७-६, ७-६(७-५) असा सरळ सेटमध्ये पराभव करत १० व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले.
गेल्या वर्षी कोविड लस वादामुळे नोव्हाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या जोकोविचने वर्षभरानंतर शानदार पुनरागमन करत त्सित्सिपासलला विजयाची संधी दिली नाही.
जोकोविचने सामन्याची शानदार सुरुवात केली.पहिला सेट ६-३ ने आपल्या नावावर करत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. यानंतर त्सित्सिपासने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले पण जोकोविचने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये ७-६ अशा फरकाने जिंकला. तिसर्या सेटमध्येही दोन्ही खेळाडू ६-६ ने बरोबरीत होते, त्यानंतर जोकोविचने टायब्रेकरमध्ये ७-५ असा विजय मिळवला आणि दहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या विजेतेपदासह ३५ वर्षीय जोकोविचने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालची बरोबरी केली आहे. दोघांच्या खात्यात आता २२-२२ जेतेपदे आहेत. निवृत्त रॉजर फेडरर २० ग्रँड स्लॅम विजेतेपदांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोविचच्या २२ विजेतेपदांमध्ये १० ऑस्ट्रेलियन ओपन, २ फ्रेंच ओपन, ७ विम्बल्डन आणि ३ यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे.
Tags
क्रीडा
