कल्याण : कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले असून घरात झोपलेल्या ७० वर्षीय आजी व तिची २२ वर्षीय नातू आगीत गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. खातीजा हसम माइमकर ( ७० ) व इब्रा रौफ शेख ( २२) असे दोघांची नावे आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.