शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बुधवारी बंद

 



ठाणे: महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य अशुद्ध जलवाहिन्याची तसेच मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील अत्यावश्यक कामे करण्याकरिता बुधवार 18 जानेवारी रोजी 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधील आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्र. एनएच-3 च्या लगत गळती काढणे, शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर लोढाधाम जवळ गळती काढणे, साकेत पुलावरील मुख्य जलवाहिनीवर व्हॅक्युम एअरव्हॉल्व्ह बसविणे, इंदिरानगर संपकडे नव्याने टाकण्यात आलेल्या 1168 मि.मि. जलवाहिन्यांची मुख्य जलवाहिनीस जोडणी करणे, पाणीपुरवठ्यामधील दैनंदिन देखभाल व दुरूस्तीची अत्यावश्यक कामे करणे तसेच स्टेम प्राधिकरणाकडून त्यांच्या योजनेमधील दैनंदिन निगा आणि देखभाल तसेच दुरूस्तीची अत्यंत आवश्यक कामे करण्याकरिता सदरचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने  वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आला आहे.

या भागात राहील पाणीपुरवठा बंद 

बुधवार जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते गुरूवारी सकाळी 9.00 वाजेपर्यत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी,सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर,सिद्धेश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग आदी भागात 24 तासांसाठी पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील.


Post a Comment

Previous Post Next Post