कल्याण : सध्या सर्वत्र वाहतूक सुरक्षा सप्ताह सुरु असून वाहतूक सप्ताह निमित्ताने कल्याण विभागातील कल्याण कोळशेवाडी डोंबिवली येथील पालक व विद्यार्थ्यांना आचार्य अत्रे मंदिर कल्याण या ठिकाणी रस्ता सुरक्षा व वाहतूक संबंधाने पीपीटी द्वारे माहिती देऊन विद्यार्थी व पालक यांच्याकरिता समुपदेशन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात केडीएमसी सचिव संजय जाधव,वाहतूक शाखेचे एसीपी मंदार धर्माधिकारी, कल्याण विभाग सर्व प्रभारी अधिकारी अंमलदार पालक विद्यार्थी सहभागी झाले होते. कोविड काळात चांगले काम करणारे नागरिक तसेच गणपती नवरात्र उत्सवात सहकार्य करणारे लोकांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले असल्याची माहिती यावेळी कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.
सर्वानी वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापर ,सिटबेल्ट वापरा, ओव्हरस्पीड करू नका, रस्ता मोकळा दिसला म्हणून गाडी वेगाने पळवू नका, दारू पिऊन गाडी चालवू नका असे आवाहन यावेळी उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना केले असल्याचे वाहतूक शाखेचे एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले. यावेळी कल्याण वाहतूक शाखेचे महेश तरडे, कोळसेवाडीचे रवींद्र क्षीरसागर, डोंबिवलीचे उमेश गित्ते आदींसह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बाईट : - मंदार धर्माधिकारी -( सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा )
Tags
महाराष्ट्र