गोरेगाव सिद्धार्थनगर पुनर्विकास सभासदांच्या पात्रता निश्चितीसाठी विशेष शिबीर



  •  वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात दोन दिवसांचे विशेष शिबीर 

मुंबई :  मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे गोरेगाव सिध्दार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पातील आर ०९ हिश्श्यातील पात्र सभासदांना पुनर्वसन इमारतीमध्ये संगणकीय सोडतीद्वारे सदनिका वितरण करण्यासाठी पात्रता निश्चितीकरिता १८ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात दोन दिवसांचे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 
        दोन दिवसीय शिबिरामध्ये पात्र सभासदांनी म्हाडा मुख्यालयातील उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई पश्चिम उपनगरे, मुंबई यांच्या कार्यालयात मूळ आधारकार्ड, त्याची स्वस्वाक्षरीत छायांकित प्रत तसेच पॅनकार्ड व इतर विहित कागदपत्रांसहित दुपारी ११ ते चार या कालावधीत उपस्थित राहून पात्रता पडताळणी विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी केले आहे.   

       सिध्दार्थ नगर पुनर्विकास प्रकल्पातील आर ०९ पुनर्वसन हिश्श्यातील एकूण ६७२ सभासदांपैकी ४३० सभासदांनी २६ ते २९ डिसेंबर, २०२२ दरम्यान आयोजित विशेष शिबिरामध्ये कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे उर्वरित सभासदांनी कागदपत्रांची पडताळणी लवकरात लवकर करून घेण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात येत आहे. 
(वैशाली गडपाले)
मुख्य जनसंपर्क अधिकारी / प्राधिकरण 

Post a Comment

Previous Post Next Post