आदिवासी विद्यार्थ्यांना रोटरी क्लबमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप


दिवा \ आरती परब : शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या वतीने मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे ३०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, छत्र्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.


मुरबाड तालुक्यातील जाई इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद शाळा तागवाडी (म्हसा) तसेच अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुऱ्हाडपाडा येथील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी, या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.


यावेळी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रकल्प प्रमुख गजानन पाटील, रोटरियन साईनाथ म्हात्रे, अंकुर मुंडे, मोहित भोईर तसेच पियुष म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संबंधित शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



Post a Comment

Previous Post Next Post