कमल चावलाचा जैसन मल्होत्रावर विजय


 सीसीआय स्नूकर क्लासिक 2023 स्पर्धा

मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या आयोजित 12.1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक 2023 स्पर्धेत राउंड ऑफ 16 फेरीत भारताचा नंबर वन खेळाडू रेल्वेच्या कमल चावलाने दिल्लीच्या जेसन मल्होत्रावर 4-2 (89-60, 14-79, 71-10, 81-23, 81-23, 46-73, 74-41) असा विजय मिळवला.
सीसीआयच्या  सर विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन चावलाने त्याच्या  कामगिरीवर समाधानी असल्याचे नमूद केलेमी चांगला खेळत आहे आणि चेंडूंवर नियंत्रण ठेवत आहेमी प्रत्येक सामन्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहेपरंतु सुरुवातीस मोक्याच्या वेळी ब्रेकमध्ये रूपांतरित करण्यात अपयश आलोकाही सोपे पॉट गमावलेजेसन मल्होत्राने माझ्या चुकांचा फायदा उठवत चांगला खेळ केलामात्रशेवटच्या चार ब्रेकमध्ये मी सातत्य राखलेअसे तो म्हणाला.
राष्ट्रीय स्नूकर उपविजेता आणि भारताचा दुसर्या महाराष्ट्राचा स्पर्श फेरवानी यालाही लौकिकाप्रमाणे खेळ करता आला नाहीमात्रत्याने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आणि हसन बदामीवर 4-2 (28-63, 65-31, 56-12, 42-55, 61-17, 72-23) अशी मात करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अन्य उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रीय ज्युनियर स्नूकर चॅम्पियन हरियाणाचा दिग्विजय कडियन आणि महाराष्ट्राचा सुमेर मागो हे अनुक्रमे पुष्पेंदर सिंग (रेल्वेआणि सौरव कोठारी (पीएसपीबीयांच्याकडून पराभूत झालेपुष्पेंदरने दिग्विजयचा 4-2 (39-83, 74-12, 32-89, 69-28, 83-33, 82-26) असा पराभव केला तर बंगालचा क्युइस्ट कोठारीने अनुभवाच्या जोरावर सुमेर याला  4-0 (74-47, 85-23, 113-12, 57-39) असे पराभूत केलेयात त्याचा तिसरा ब्रेक हा 96 गुणांचा होता.




Post a Comment

Previous Post Next Post