- सीसीआय स्नूकर क्लासिक 2023 स्पर्धा
मुंबई : राष्ट्रीय स्नूकर विजेता रेल्वेचा कमल चावला आणि उपविजेता महाराष्ट्राचा स्पर्श फेरवानी यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या आयोजित 12.1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक 2023 स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
सीसीआयच्या सर विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेच्या राउंड ऑफ 64 फेरीला मंगळवारी सुरुवात झाली. बेस्ट ऑफ सेव्हन फ्रेम्समध्ये भारताचा नंबर वन खेळाडू चावलाने दिल्लीच्या संदीप गुलाटीचे आव्हान 4-2 (78-12, 53-11, 37-84, 40-66, 65-39,53-29) असे मोडून काढले. मुंबईच्या स्पर्शने तीन अर्धशतकी ब्रेक मारताना रेल्वेच्या ई. पांडुरंगय्याला 4-0 (80-11, 94-21, 71-23, 73-0) अशा फरकाने सहज हरवले.
निकाल - राउंड ऑफ 64: कमल चावला (रेल्वे) विजयी वि. संदीप गुलाटी (दिल्ली) 4-2(78(42,35)-12, 53-11, 37-84, 40-66, 65-39, 53-29);
जैसन मल्होत्रा (दिल्ली) विजयी वि. रायन राझमी (महाराष्ट्र) 4-3(73-29, 72-58, 19-53, 36-67, 23-71, 58-28, 76-19);
इशप्रीत सिंग चढ्ढा (महाराष्ट्र) विजयी वि. दिलीप कुमार 4-2(100(65)-38, 18-61, 81(81)-1, 58-65(46), 100(59)-1, 64-49 );
पुशेंदर सिंग (रेल्वे) विजयी वि. के. श्रीनू (रेल्वे) 4-2(120(81)-0, 39-61, 66-29, 87-31, 53-61, 64-1;
स्पर्श फेरवानी (महाराष्ट्र) विजयी वि. ई. पांडुरंगय्या (रेल्वे) 4-0(80-11, 94(66)-21, 71(57)-23, 73(73)-0);
दिग्विजय कडियन (हरयाणा) विजयी वि. आर. गिरीश (रेल्वे) 4-1(57-30, 91(71)-7, 12-58, 60-19, 72-5);
हसन बदामी (महाराष्ट्र) विजयी वि. पारस गुप्ता (उत्तर प्रदेश) 4-2(64(53)-42, 58-78, 51-76, 81-51, 65-18, 62-35);

