डोंबिवली :
22 मे 1986 रोजी पुंडलिक पै यांनी पै फ्रेण्डस लायब्ररीची स्थापना केली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त 100 पुस्तके होती. आता पै फ्रेण्डस लायब्ररीचा प्रवास ४.५० लाख पुस्तकांपर्यंतचा पोहोचला आहे. लायब्ररीच्या अन्य शाखाही झाल्या आहेत. साधारण वीस हजार सभासद लायब्ररीचे झाले आहेत. या सभासदांना एकत्र ठेवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुंडलिक पै यांनी विविध उपक्रम चालू केले. त्यापैकीच पै फ्रेण्डस कट्टा हा एक उपक्रम. यातून परिसरातील अनेक साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
22 मे 1986 रोजी फक्त 100 पुस्तकांसह सुरू झालेला पै फ्रेण्डस लायब्ररीचा प्रवास ४.५० लाख पुस्तकांपर्यंतचा पोहोचला आहे. आज या पै फ्रेण्डस लायब्ररीचे वीस हजार सभासद आहेत.पै फ्रेंड्स लायब्ररीचे सर्वेसर्वा पुंडलिक पै यांनी हा प्रवास 'गाथा कतृत्वाची कथा एका पुंडलिकाची' या मुलाखतीतून उलघडला.पत्रकार या अनिकेत घंमडी यांनी घेतलेल्या या मुलाखतीत या प्रवासा अनेक पैलू समोर आले.
20 ते 29 जानेवारी दरम्यान होणारा पुस्तक आदान प्रदान महोत्सवानिमित्त पुंडलिक पै यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये पुंडलिक पै यांनी आदान प्रदान महोत्सवाची संकल्पना कशी सुचली हे ही स्पष्ट केले. 2017 रोजी पहिले आदान प्रदान पुस्तक प्रदर्शन झाले. यात आठ हजार वाचकांनी भेट दिली तर पन्नास हजार पुस्तकांचे आदान प्रदान झाले. पहिल्याच प्रदर्शनाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्यानं उत्साह वाढल्याचे पै यांनी सांगितले.
मुलाखतीच्या आधी युवराज ताम्हणकर यांनी त्यांच्या सहका-यांसोबत भारुड सादर केले. यातून आदान प्रदान महोत्सावाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. दिपाली काळे यांनी आदान प्रदान महोत्सवात कोणते कार्यक्रम होणार आहेत याची माहिती दिली, शिवाय या साहित्य सोहळयाला मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी पंडित सर, माधव जोशी, रिटा शाह, वृंदा भुस्कुटे, कौशिक लेले, सुधीर जोगळेकर, उमा आवटे पुजारी, विवेक ताम्हणकर आदी मान्यवर उपस्थित होते. ललिता छेडा यांनी अनिकेत घमंडी आणि सुनंदा पै यांचे स्वागत केले. यावेळी सचिन चोगले यांनी आभार व्यक्त केले.

२० जानेवारी पुस्तक आदान प्रदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना आमंत्रित कऱण्यात आले होते. हे आमंत्रण थेट राष्ट्रपतींना देण्याची संधी पै यांना मिळाली. प्रत्यक्ष राष्ट्रपतींना भेटून त्यांनी या आदान प्रदान सोहळ्याची माहिती देताना आपण भारावलो होते, असे पै यांनी उपस्थितांना सांगितले. तसेच राष्ट्रपतींनी या उपक्रमाचे कौतुक करत, संधी मिळाली तर नक्की भेट देऊ, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या या सर्व यशामध्ये लायब्ररीचे हितचिंतक आणि सर्व कर्मचारी यांचा मोठा वाटा असल्याचे पै यांनी सांगितले. तसेच पत्नी सुनंदा पे, मोठे भाऊ मंजुनाथ पै, व्यंकटेश पै, पांडुरंग पै यांचाही मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags
महाराष्ट्र