- कबड्डी स्पर्धेत केदारनाथ क्रीडा मंडळ, वेळे संघ अंतिम विजयी
दिवा : कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने यावर्षी महाळुंगे या गावी क्रीडा महोत्सव तसेच कोयना क्षत्रिय मराठा समाजाचे स्नेहसंमेलनाचे आयोजन दि. २८ आणि २९ जानेवारी २०२३ रोजी करण्यात आले होते. यामध्ये केदारनाथ क्रीडा मंडळ, वेळे या संघाने कबड्डी स्पर्धेचे अंतिम विजेते पदाचा मान मिळवला तर उपविजेता जय भवानी क्रिडा मंडळ करंजावडे भवानी नगर हा संघ ठरला.
या प्रमुख कबड्डी स्पर्धा पारितोषिक समारंभ प्रसंगी श्री राम वरदाईनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष - प्रतापराव शिंदे, अरुण शिंदे - अध्यक्ष दसपटी क्रीडा मंडळ, कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ - अध्यक्ष विजय मोरे, सरचिटणीस - सुरेश साळवी, कार्याध्यक्ष - शिवाजी साळुंखे, खजिनदार - दिलीप कदम, सहसचिव कृतीका कदम, अशोक बुवा मोरे, अरुण कदम, शिवाजी मोरे, मिलिंद मोरे यांची उपस्थिती होती.
कोरोना काळात कुठलाच सामाजिक बांधिलकीचा कार्यक्रम कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या वतीने घेण्यात आला नाही. यामुळे तीन वर्षानंतर यावेळेस स्नेहसंमेलन आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले. समाजाचा ध्वज फडकावून क्रीडांगणाचे उद्घाटन आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोयना पुनर्वसन गावे माझ्या मतदार संघामध्ये आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्याचे माझे कार्य आहे, या संदर्भात मी नक्कीच प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार शांताराम मोरे यांनी कोयना पुनर्वसन नागरिकांना दिले. या प्रसंगी विनायकराव मोरे - अध्यक्ष श्री निरीपजी देवी देवालय न्यास, विठ्ठल मोरे - अध्यक्ष अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ, सचिन मोरे - अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था, बळीराम शिंदे माजी अध्यक्ष अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ, एस बी जंगम - अध्यक्ष जोम मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट, अनुराग शर्मा, डायरेक्टर शिराज सी लालकाका इंटरप्राईजेस प्रा.ली, भूपेश घोसाळकर - अध्यक्ष सदैव प्रतिष्ठान यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणगौरव समारंभ प्रसंगी भूकंपग्रस्त गावे कशी असतात ती मी डोळ्यांनी पहिली आहेत, यामुळे कोयना पुनर्वसन गावे भूकंपग्रस्त देखील असून तरीही तुमची सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात असून चांगल्या प्रकारे त्यांचा विकास सुरू आहे. तसेच आमदार म्हणून मी देखील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार बालाजी किणीकर यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.
तसेच कोयना क्षत्रिय समाज हा मराठा समाज असून आपला समाज हा खूप मोठा आहे, समाजातील वडीलधाऱ्या मंडळींनी आपली मुले शिक्षणासाठी परदेशात नक्की पाठवावी पण त्यांना स्वतः कमावून जमा केलेला सर्व पैसा मात्र देऊ नये, कारण मुले परदेशात जातात आणि नंतर त्याच ठिकाणी कायमस्वरूपी राहिल्यानंतर आई - वडिलांना मुलाविना राहावे लागते असा सल्ला श्री राम वरदाईनी देवस्थान अध्यक्ष प्रतापराव शिंदे यांनी नागरिकांना दिला.
दहावी, बारावी, पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण दीडशे विद्यार्थ्यांना, विशेष प्राविण्य मिळवणारे,व खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या प्रसंगी मनोज शिंदे - माजी विरोधी पक्ष नेता ठामपा, नगरसेविका संध्या मोरे, दिलीप कदम- माजी अध्यक्ष कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघ, जयवंत दरेकर- अध्यक्ष कोकण विकास समिती, सुरेश साळुंखे - अध्यक्ष समस्त साळुंखे परिवार सामाजिक व शैक्षणिक संस्था, ज्येष्ठ समाजसुधारक सुरेश मोरे उपस्थित होते. तसेच हळदी - कुंकू समारंभ प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.
कोयना क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. यामुळे यावर्षी स्न्हेसंमेलनात कर्तृत्ववान ज्येष्ठांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने विश्वनाथ मोरे ( महाळूंगे), जयराम कदम ( कोयना वेळे ), मानसिंग साळुंखे ( चिरंबे ), कै. मधुकर कदम ( जांब्रूक), कै. सुरेश साळुंखे ( (कुसवडे), रघुनाथ कदम ( करंजावडे - भवानीनगर), सूर्यकांत मोरे ( उचाट), वैशाली शिंदे (कोळकेवाडी), पांडुरंग साळुंखे ( कुसवडे) तसेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुरेश मोरे, पोलीस सहा.उपनिरीक्षक ठाणे, सुरेश कदम, पोलीस सहा.उपनिरीक्षक मुंबई यांना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तर शिक्षण महर्षी सन्मानाने यशवंत मोरे यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
राष्ट्रीय खेळाडू कै. अर्जुनराव कदम क्रीडा नगरी येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत ठाणे, पालघर, रायगड, चिपळूण, रत्नागिरी येथून आलेल्या २१ संघांनी सहभाग घेतला यामध्ये अंतिम सामना केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे आणि जय भवानी क्रिडा मंडळ करंजावडे भवानी नगर यांच्या मध्ये चुरशीचा झाला यामध्ये केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे संघ हा १३ गुणांनी विजयी झाला. तर उपांत्य उप विजयी ओवळी क्रीडा मंडळ ओवळी, जय भवानी करंजावडे भवानी नगर ठरला. तसेच अंतिम उपविजयी जय भवानी करंजावडे हा संघ ठरला, या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू केदारनाथ वेळे संघाचा ओमकार कदम हा ठरला, उत्कृष्ट चढाई जय भवानी करंजावडे भवानी नगर संघाचा राज शिंदे ठरला, उत्कृष्ट पकड केदारनाथ वेळे संघाचा विपुल चव्हाण ठरला तसेच शिस्तबद्ध संघ देऊळ वाडी क्रीडा मंडळ ओवळी संघ ठरला.
या सर्व स्नेहसंमेलनाचे संयोजक ग्रामविकास मंडळ महाळूंगे, ग्रामस्थ मंडळी महाळूंगे होते. तसेच महाळुंगे ग्रामस्थ आणि कोयना क्षत्रिय मराठा समाज सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रम आणि कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
Tags
महाराष्ट्र