पवार कुटुंबियांना शिंदे- फडणवीस सरकारबद्दल द्वेष



प्रवीण दरेकर यांची टीका 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेला कुंभारखान पाडा येथील गणेशघाटजवळ भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या स्व.अटलबिहारी बाजपेयी चषक कबड्डी सामन्यात दरेकर यांनी शिंदे- फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष राज्यात सत्ता ठेवून महाराष्ट्रातील जनतेची कामे केली आहे.मात्र पवार कुटुंबियांना शिंदे- फडणवीस सरकारचा द्वेष असल्याचे दिसते टीका केली.

 यावेळी दरेकर यांनी म्हात्रे यांचे कौतुक करत महाराष्ट्राच्या मातीत कबड्डी सामने भरवून अशा खेळांना प्रोत्साहन दिल्याचे सांगितले. शिंदे- फडणविस सरकार खेळाडूंच्या सुविधांसाठी प्रयत्नशील आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही खेळाडूंना प्रोत्साहन देता आहेत.

   यानंतर पत्रकारांच्याया प्रश्नांना उत्तरे देताना दरेकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टिका केली.ते म्हणाले, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे हे सतत शिंदे- फडणवीस सरकारवर बोलत असतात. शरद पवार यांच्याशिवाय मोठा नेता नाही असा त्यांना समज आहे. पण 5 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची कामे करून विश्वास मिळविला.म्हणूनच तर अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकार उलथवून पुन्हा एकदा जनतेचे सरकार आले. पुढे दरेकर यांना मंत्री पदाबाबत म्हणाले, जनतेची कामे हे सरकार करत असून आमदारांना मंत्री पदाची चिंता नाही.आमदर असंतुष्ट आहे  हे चुकीच आहे.



Post a Comment

Previous Post Next Post