३ तास १९ मिनिटात १२ किलोमीटर सागरी जलतरण अंतर पार
डोंबिवली / शंकर जाधव
१२वर्षीय साहसी व धाडसी देलिना वाळकेने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १२ किलोमीटर सागरी जलतरण अंतर ३ तास १९ मिनिटात पोहून पार करण्याची कामगिरी केली. देलीना ही यश जिमखान्यात चार महिन्यांपासून प्रशिक्षक विलास माने व रवि नवले यांच्याकडून पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहे. २७ जानेवारीला पहाटे ५ वाजता अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे निरीक्षक नील लबदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलिफंटा जेटी येथून प्रवास सुरू करून सागरी लाठांशी झुंज देत,समुद्रातील वाढत्या प्रदषणामुळे,आणि मोठ्या बाज,जहाज बोटी यांच्या लाठांचा ,प्रतिकूल प्रवाहांशी पूर्ण ताकदीनिशी सामना करत सकाळी ८ वाजून १९ मिनिटात गेटवे ऑफ इंडिया गाठले.
देलीना ही दररोज सकाळी व संध्याकाळी सराव करते.यश जिमखाना मॅनेजर मनोज सापरा,पतंगे मॅडम आणि स्टाफ यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन देलीना मिळाले.तसेच ओपन वॉटर असोसिएशन चे संतोष पाटील यांच्याकडे आठवड्यातून दोन वेळेस समुद्रात सराव करते. देलीनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्यात राज , अल्फा, साईश होते. देलिनाचे आता सर्वत्र कौतुक आणि होत आहे.
Tags
महाराष्ट्र
