डोंबिवली : पश्चिम कुंभार खान पाडा,होली क्रॉस स्कूल समोरील बांधकामधारक मनोज म्हात्रे, मंदार म्हात्रे, मयूर म्हात्रे यांच्या तळ+६ मजली इमारतीच्या बांधकामाचे स्लॅब निष्कासित कारवाई दिवसभरात केली.
सदर कारवाई करतेवेळी या ठिकाणी बांधकामधारकांनी महापालिकेची यंत्रसामुग्री व मनुष्यबळ पोहचू नये, याकरिता इमारतीच्याकडे जाण्याच्या रस्त्यात वाहने ऊभी करून अडथळा निर्माण केला होता.
तथापि संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करुन पोलीस विभागामार्फत अडथळा दुर करण्याची कारवाई झाल्यानंतर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर बांधकामधारकांवर यापूर्वीच एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी नागरिकांना महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येते की, कल्याण डोंबिवली परिसरात घरे घेताना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात किंवा नगररचना विभागाकडे बांधकामाच्या अधिकृततेबाबत चौकशी करुन घरे विकत घ्यावीत.