डोंबिवली / शंकर जाधव
समीर ज्ञानप्रसारक विश्वस्त निधी संचालित ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा(मराठी माध्यम) व ज्ञानदीप कॉन्व्हेंट स्कूल मुंब्रा (इंग्रजी माध्यम) या शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनी कवायत व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी टिपरी कवायत सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत देशभक्तीपर गीते सादर केली. शाळेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी ठाणे महानगरपालिका आणि वयम यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित किल्ले बांधणी स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचा गुणगौरव करण्यात आला. ठाणे टायगर्स आयोजित टाकाऊपासून टिकाऊ. वस्तू निर्मिती स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त विद्यार्थिनी कु.चांदणी गुप्ता, हिचा देखील गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमात वैयक्तिक व सांघिक क्रीडा, स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
दरवर्षीप्रमाणे अंदाही शाळेचे माजी संस्थापक कै. चंद्रकांत बाबाजी देसाई सर यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या स्मरणशक्ती बुद्धीबळ, मेहंदी, व टॅटू,स्पर्धेतील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सतीश देसाई संस्थेचे सेक्रेटरी समीर देसाई , उपाध्यक्षा शिवानी देसाई , खजिनदार प्रविणा देसाई , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक बहाटे , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी कदम , इंग्रजी माध्यमाच्या सुपरवायझर पूवाॅ गुजर, आदिती,श्रेया, श्रुती, छांयाक, समर्थ, आदि मान्यवर उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र
