दिवा : दिवा पुर्व भागातील साबेगावातील श्री समर्थ मित्र मंडळ गेल्या दहा वर्षांपासून माघी गणेशोत्सव साजरा करत आहे. श्री समर्थ मित्र मंडळ यांच्यावतीने प्रत्येक वर्षी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमन केले जाते, प्रत्येक वर्षी सुंदर रेखीव सजावट व देखावा असतो.
यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र केदारनाथ मंदिराची सुंदर अशी कलाकृती साकारण्यात आली असता, सदर देखावा पाहण्यासाठी यावर्षी भक्तांची प्रचंड गर्दी पहावयास मिळाली, मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश रामचंद्र भोईर, कु. गौरव गणेश पाटील, बंड्या पाटील, आकाश भोईर, विपिन भोइर, प्रणव भोईर, ओमकार वारेकर, सत्कार वारेकर, तेजस कदम, राहुल गोलापल्ली, आतिश साळुंखे, प्रतिश साळुंखे, मच्छिंद्र भोईर, विकास पाटील, आदित्य म्हात्रे, साईनाथ भोईर, राहुल पाटील, रोशन पाटील आदी कार्यकर्त्यांनी साकारला असून, मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात, रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, बीपी शुगर कॅम्प, हार्ट डिसीज असे अनेक आरोग्य शिबिराचे उपक्रम या मंडळाच्या वतीने राबवले जातात. तसेच यावर्षी सुद्धा नेत्र चिकित्सा शिबिर राबवण्यात आले होते, या शिबिराचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला.
Tags
महाराष्ट्र
