- इंग्लंडच्या स्टीफन ली याच्यावर 7-2 असा विजय
मुंबई: द प्रिन्स ऑफ इंडिया क्यू स्पोर्ट्स म्हणून ओळखल्या जाणार्या पीएसपीबीच्या पंकज अडवानीने क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित सीसीआय स्नूकर क्लासिक 2023 स्पर्धेचे जेतेपद पटकावले. सुपर फॉर्मात असलेल्या पंकजने अंतिम फेरीत इंग्लंडच्या स्टीफन ली याच्यावर 7-2 (53-101, 73(73)-28, 114(82)-14, 74(43)-30, 87(87)-0, 67 (67)-31, 28-60, 115(115)-0, 106(70)-15)
असा एकतर्फी विजय मिळवला.
12.1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेत सीसीआयच्या सर विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये शनिवारी झालेला अंतिम सामना एकतर्फी झाला. बेंगळुरूस्थित 37 वर्षीय अडवानीने जबरदस्त फॉर्म राखताना 73 (दुसरी फ्रेम), 82 (तिरी), 43 (चौथी), 87 (पाचवी), 67 (सहावी), 115 (आठवी) आणि 70 (नववी) असे अप्रतिम ब्रेक करून प्रतिस्पर्ध्याला पुरते नामोहरम केले. त्याच्या सातत्यासमोर ली याचा अजिबात टिकाव लागला नाही.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत अडवाणीने बेस्ट ऑफ इलेव्हन सामन्यात आणखी एक अप्रतिम खेळी करताना भारताचा तिसर्या क्रमांकाचा खेळाडू इशप्रीत सिंग चढ्ढा याला 6-1(133-0, 99-33, 63-39, 90-40, 29-82, 72-56, 57-49) असे सहज हरवले.
दुसर्या टेबलवर, भारताचा राष्ट्रीय स्नूकर चॅम्पियन कमल चावलाने 4-1 अशी आघाडी मिळवली तरीही त्याला इंग्लंडच्या स्टीफन लीकडून 6-4 असा पराभव पत्करावा लागला. चार फ्रेम गमावूनही ली निश्चिंत होता. त्यानंतर त्याने सलग पाच फ्रेम जिंकून दणदणीत पुनरागमन केले आणि 76 गुणांच्या ब्रेकसह 28-78, 47-73, 2-60, 81-36, 1-70, 68-20, 69-0, 67-50, 61-42, 76-14 अशी बाजी मारली.