मुंबईत हॉप ऑन–हॉप ऑफ बसची सुविधा

 

आगामी कालावधीत ही बस राज्यभरात सुरू करणार 

मुंबई  : पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन – हॉप ऑफ बसची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 
पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.  
 पर्यटनमंत्री लोढा यांच्या हस्ते विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन मंत्रालयात करण्यात आले. तसेच दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. बुक माय शो या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या हॉप ऑन – हॉप ऑफ बसचे आरक्षण दर कमी असतील. तसेच  आगामी कालावधीत ११ हॉप ऑन – हॉप ऑफ बस राज्यभरात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.
  महामंडळाच्या चित्रफित, छायाचित्र आणि दिनदिर्शिकेचे प्रकाशन, अजिंठा लेणी आकाश निरीक्षण उपक्रम, एमटीडीसी आणि एचआर कॉलेजच्या सहकार्याने युवा पर्यटन संघ उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. युवा पर्यटन संघ हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.

   हॉप ऑन – हॉप ऑफ बस मुंबईमध्ये प्रायोगिक‍ तत्वावर सुरू केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल. या बसचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करता येणे शक्य होणार आहे.आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात ११ होहो बसेस पर्यटनस्थळी देण्यात येतील, अशी माहितीही पर्यटन मंत्री लोढा यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post